3 मुलांना घरात ‘लॉक’ करून नव्या ‘बायफ्रेन्ड’सोबत झोपण्यासाठी गेली महिला, मिळाली ‘ही’ शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडमधील लँकाशयारमधून एक घटना समोर आली असून येथील एका महिलेला 18 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपल्या मुलांना घरात बंद करून बॉयफ्रेंडसोबत झोपण्यास गेलेल्या या महिलेला 18 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने आपल्या 3 मुलांना बेडरूममध्ये लॉक करून तेथे काही टॉयलेट पेपर आणि एक बादली ठेवली. त्यानंतर ती आपल्या बॉयफ्रेंडसह हॉटेलमध्ये झोपण्यासाठी गेली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना मुले अतिशय वाईट अवस्थेत आढळून आली. या महिलेने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला असून मुले तिच्या ताब्यात होती. यावेळी न्यायालयाने तिला या प्रकरणात हलगर्जीपणामुळे दोषी ठरवत 18 महिन्यांची शिक्षा दिली आहे.

दरम्यान, या महिलेने आपल्या बहिणीला या मुलांचा सांभाळ करण्यासाठी सांगितला होता. मात्र तिच्या बहिणीला हे शक्य झाले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्यानंतर पोलीसांनी या महिलेला अटक केली होती.

Visit : Policenama.com