क्रुरपणाचा कळस ! ‘तु रडणार… खुप रडणार’ असा WhatsApp पतीला करून पत्नीनं केला मुलाचा खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानातील जयपूर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. भांकरोटा येथील एका महिलेने स्वत:च्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला ठार केले. नविता मीना असे या महिलेचे नाव आहे. नविता ही आपल्या मुलांसोबत राहत होती. अनेक दिवसांपासून तिचे आपल्या नवऱ्यासोबत हुंड्यावरून भांडण सुरु होते त्यामुळे नविता खूप तणावात असायची. तणावातून तिने चिमुकल्याला ठार करण्याचा निर्णय घेतला.

नविताने आपल्या तीन वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेऊन त्याला दहा मिनिटे दाबून ठेवून त्याचा जीव घेतला. त्यानंतर नविताने घरच्यांना मुलगा बेशुद्ध पडल्याचे सांगितले. तेव्हा मुलाला तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर नविताने मुलाचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. नविताच्या पतीला याची भनक लागताच त्याने पोलिसात धाव घेतली आणि यावर संशय व्यक्त केला.

पोलिसांनी वेळेत पोहचून मुलाचा मृतदेह चितेवरून ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी दिला आणि नविताला ताब्यात घेतले. यादरम्यान नविताकडून जी माहिती मिळाली ती खूपच धक्कादायक होती.

नविताने चौकशीदरम्यान सांगितले की, या मुलाला मारल्यानंतर तिचा मोठ्या मुलाला मारण्याचा हेतू होता. त्यासाठी ती मुलाला आठव्या मजल्यावरून खाली ढकलून देणार होती. तीने मुलाला जवळ बोलावले मात्र मुलगा एवढ्या उंच ठिकाणी घाबरत असल्यामुळे तिने मुलाला सांगितले की, चांद्रयानातून एक मुलगा खाली पडला आहे तो तुला दाखवते.

त्यानंतर मुलगा थेट नविताला जाऊन बिलगला आणि तू किती छान आहेस आई असं म्हणाला, त्यावर नविता भावून झाली आणि तीने तो प्लॅन रद्द केला. मुलाच्या मृत्यू नंतर पती राजेशला मोठ्ठा धक्का बसला आहे आणि वारंवार याच गोष्टीचा उल्लेख करत आहे की, मला नविताने एक मेसेज केला होता, त्यात लिहिले होते की, तू रडणार… खूप रडणार मिस्टर राजेश !

Visit : policenama.com