आईचे प्रेम की आईवर अत्याचार? महिलेने ऑक्सीजन लावलेला असतानाही केला स्वयंपाक, फोटो वायरल

नवी दिल्ली : आपल्या मुलांसाठी आईचे प्रेम निस्वार्थ आणि अमर्याद असते. दु:ख, वेदना आणि आजारात सुद्धा ती त्यांचे पोट भरण्यास विसरत नाही, पण इंटरनेटवर वायरल झालेल्या एका फोटोतील आईचे हेच प्रेम पाहून यूजर्स भडकले. ही नाराजी, तिची प्रकृती ठीक नसतानाही तिला स्वयंपाक करण्यास सांगितल्याची होती.

वायरल फोटोत एक महिला ऑक्सीजन सपोर्टवर असूनही स्वयंपाक घरात पोळ्या लाटताना आणि शेकताना दिसत आहे. या फोटोच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे आईचे निस्वार्थ प्रेम. आईला कधीही सुट्टी नसते. हा फोटो पाहून अनेक यूजर्स भडकले. प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने सुद्धा फोटोवर कठोर प्रतिक्रिया दिली. तिने फोटो शेयर करत लिहिले की, महिलांना आराम न करण्यास भाग पाडणार्‍या या निस्वार्थ प्रेमाचे सत्र थांबू शकते का. तर तामिळ चित्रपट निर्माते मोहम्मद अली यांनी म्हटले, हे प्रेम नाही, ही सामाजिक रचनेच्या नावावर गुलामी आहे.

 

 

 

मात्र, काही यूजर्सने या फोटोच्या सत्येतेवर प्रश्न उपस्थित करत तो बनावट असल्याचे म्हटेल आहे. पण बहुतांश यूजर्सने आजारात होत असलेल्या या अत्याचाराला आईचे प्रेम म्हटल्याने संताप व्यक्त केला आणि महिलेच्या कुटुंबाला दुषणे दिली.