आईनं केला ‘सॅल्यूट’, हात जोडून ‘स्मरण’ केल्यानंतर ‘चेहरा’ न पाहता शहीद मुलाचं घेतलं ‘अत्यंदर्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या आईने मुलाला जन्म दिला ती आईच शेवटच्या क्षणी मुलाचा चेहरा बघू शकली नाही. देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीदाचा शेवटचा प्रवास तिच्यासाठी असा दु:खदायक होता.

जम्मू -काश्मीरच्या राजौरी सेक्टर सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या सुखविंदर सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव शरीर तिरंग्यातून बुधवारी दुपारी त्यांच्या फतेहपुर गावात आणण्यात आले. यावेळी येथे उपस्थित लोकांनी भारत मात की जय आणि शहीद सुखविंदर सिंह अमर रहे च्या घोषणा दिल्या.

येथे उपस्थित कुणालाही शहीद सुखविंदर यांचा चेहरा पाहता आला नाही. सुखविंदर यांची आई रानी देवी आणि भाऊ गुरपाल सिंह यांनी शहीद जवानाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, अधिकाऱ्यांनी यास नकार दिला. ते म्हणाले, पाकिस्तानच्या गोळीबारात सुखविंदर यांचा चेहरा खुपच खराब झाला आहे. यासाठी ते दाखवू शकत नाही. हे ऐकून जवानाच्या आईने एकच हंबरडा फोडला. पण, नंतर स्व:ताला सावरून या मातेने मुलाला शेवटचा सॅल्यूट करून निरोप दिला. पूर्ण शासकीय इतमामात या शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

२१ वर्षीय रायफलमॅन सुखविंदर यांचे वडील अविनाश सिंह हे पंजाब राज्याच्या वीज मंडळात एएलएल पदावर कार्यरत होते. त्यांचा २००७ मध्ये मृत्यू झाला. सुखविंदर सिंह २०१७ मध्ये सैन्यात भरती झाले होते. नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी आलेले सुखविंदर २२ नाव्हेंबररोजी १५ दिवसांची सुट्टी संपवून कर्तव्यावर हजर झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/