Video : जिन्यातून पडणार्‍या पोटच्या गोळ्याला ‘त्या’ आईनं वाचवलं !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – तो चिमुकला खाली पडणार इतक्यात चिमुकल्याच्या आईने त्याला ओढलं आणि त्याचे प्राण वाचले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडलीय कोलंबियामध्ये. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडियावर व्हायरल झाला आहे. प्रसंगावधान दाखवणाऱ्या आईचे नेटकरी कौतुक करत असले तरी मोबाईलमध्ये गुंग राहून मुलाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली.

कोलंबिया देशातल्या मेडेलिनमधली ही घटना आहे. इथल्या इमारतीत चौथ्या मजल्यावरून एक चिमुकला खाली पडत होता. पण त्याच्या आईने वेळीच प्रसंगावधन दाखवत मुलाचा जीव वाचवला. या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. ही महिला तिच्या मुलासह इमारतीच्या लिफ्टमधून बाहेर आली. महिला मोबाईलमध्ये गुंग असतानाच चिमुकल्याने धोकादायक जिन्याच्या दिशेने धाव घेतली. तो खाली पडणार इतक्यात त्याच्या आईने झेप घेऊन मुलाचे पाय धरले. त्यामुळे मुलगा खाली पडता पडता वाचला. मोबाईलमध्ये गुंग राहून स्वतःच्या लहानग्या मुलाकडे दुर्लक्ष करणे आईला चांगलेच महागात पडले असते.

‘या’ अभिनेत्रीला मिळतात केवळ ‘बार डान्सर’ आणि ‘लोकांगना’चे रोल

‘या’ डायरेक्टरला पहायचाय अभिनेता आयुष्मान खुराणाचा ‘प्रायव्हेट पार्ट’

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें

राखीव जागा न ठेवता जाहिरात देणा-या विद्यापीठांची होणार चौकशी

गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like