धक्कादायक ! जेवणाच्या वादावरून माय लेकाची आत्महत्या

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन – जेवणावरून झालेल्या वादामुळे आई व मुलाने विषप्राषण करून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द गावात बुधवारी घडली आहे. मंदाबाई मधुकर सरोदे (वय ५५) व मुलगा गणेश मधुकर सरोदे (वय ३०) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , मंदाबाई सरोदे व लहान मुलगा गणेश सरोदे या दोघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की आधी गणेशने विषारी घेतले त्यांनतर त्याच्या आईनेही विष घेतले. त्यांना तत्काळ मालेगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. जेवणाच्या कारणावरून वाद झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गणेश सरोदे यांच्या पश्चात वडील, मोठा भाऊ, वहिनी , बायको व लहान मुलगा आहे. या दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत मालेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त –

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण