दुर्देवी ! आईनं केली 2 मुलींसह आत्महत्या

इचलकरंजी/कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दोन मुलींसह (Daughers) आईने (Mother) विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडला. महिलेने गावातील पिराचा मळा भागातील विहिरीत पाच आणि चार वर्षाच्या मुलीसह उडी मारुन आत्महत्या केली. पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर अन्य लहान मुलगी व तिच्या आईची शोध मोहिम पोलिसांच्या रेस्क्यू टीमने सुरु केली. सुप्रिया शिवाजी भोसले (वय-24), मृणाली शिवाजी भोसले (वय-4) आणि मृणयी शिवाजी भोसले (वय-5 सर्व रा. जांभळी) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सुप्रिया भोसले या सोमवारी (दि.14) शाळेला जाण्याचे कारण सांगून दोन मुलींसह घराबाहेर पडली. मात्र, सायंकाळ झाली तरी घरी न आल्याने महिलेच्या घरातील कुटुंबीय चिंतेत पडले. याबाबत महिलेच्या पतीने शिरोळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. आज (मंगळवार) सकाळी महिलेच्या पतीने नातेवाईकांकडे चौकशी केली. अखेर ग्रामपंचायतच्यी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक महिला दोन मुलींसह पिराच्या मळ्याकडे जाताना निर्दशनास आली.

यानंतर त्यांचा शोध घेताना पिराच्या मळ्यातील विहरित लहान मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. या घटनेने हैराण झालेल्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. त्वरित पोलिसांनी धाव घेऊन अन्य मुलीचा आणि आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, आपल्या बायकोने व मुलींची आत्महत्या केल्याने पती शिवाजी भोसले यांनी घटनास्थळी हंबरडा फोडला. दोन मुलींसह आईने आत्महत्येच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.