धक्कादायक ! मुलांसमोर आईची आत्महत्या, दरवाजे बंद असल्याने २ मुलांचा गुदमरून मृत्यू

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – वर्धा शहरात खळबळजनक घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. वर्धा शहरातील वर्धा स्टील कॉलनीत एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसमोर गळफास घेत आत्महत्या केली. तर घराच्या खिडक्या बंद असल्याने घरामध्ये असलेल्या दोन चिमुकल्यांचाही गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. महिलेने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

सविता आशिष साहू (वय -31), आयुष आशिष साहू (वय -3), ओरा आशिष साहू (वय -9) अशी मृतांची नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. सविता साहू या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून गळफास लावून आत्महत्या केली. घराच्या दरवाजे खिडक्या बंद असल्याने आयुष आणि ओरा या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला.

साहू यांच्या घरामध्ये विपरीत घडले असल्याची शंका शेजाऱ्यांना आली. त्यामुळे त्यांनी सावंगी पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता सविता साहू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. तर दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्येचे दिसून आले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सविता यांनी आत्महत्या करण्याचं टोकाच पाऊल का उचललं याचा तपास करण्यासाठी साहू कुटुंबीयांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –