मदर तेरेसा यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु झाला आहे. बॉलिवूड स्टार, राजकीय नेते, भारतीय खेळाडू यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता आणखी एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक बनवण्यात येणार आहे.

या चित्रपटाद्वारे मदर तेरेसा यांनी केलेल्या कामाचे अनेक पैलू लोकांसमोर उघड होणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘मदर तेरेसा: द संत’ असणार आहे. चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र मदर तेरेसा यांच्या भूमिकेत कोण दिसणार ? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार ही झळकणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सीमा उपाध्यय करणार आहे. तर चित्रपटाची निर्मिती प्रदीप शर्मा, नितीन मनमोहन, गिरीश जोहर आणि प्राची मनमोहन करणार आहेत. मदर तेरेसा यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सध्याच्या मिशनरी ऑफ चॅरिटी सुपीरियर जनरलच्या सिस्टर प्रीमा मेरी पियिक यांची भेट घेतली.

या भेटीबद्दल निर्मात्यांनी सांगितले, ‘आम्ही कोलकातामधील मिशनरी ऑफ चॅरिटीला भेट दिली आणि तो अनुभव आमच्यासाठी खास होता’ तसेच उपाध्यय यांनी सांगितले मदर तेरेसा यांच्या सेवाभावी कार्यावर चित्रपट बनवताना निर्मात्यांनाही आनंद होत आहे.

ह्याही बातम्या वाचा –

प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेससोबतची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा

ठाकरे घराण्याची परंपरा मोडत आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात ?

राहुल गांधीच्या उपहासाचा न्यूज चॅनेलने लावला उलटा अर्थ

निवडणूक सभांच्या परवानगीत पक्षपातीपणा नको

‘हा’ पक्ष करतोय उमेदवारासाठी चाचपणी