अजब प्रकार ! राँग नंबरवरून 2 मुलांची आई अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली, असा झाला लव्हस्टोरीचा The End

पाटणा : वृत्तसंस्था –  बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. दोन मुलांची आई असलेली महिला चक्क एका अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली. त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र, आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले असून या प्रेम प्रकरणाची सुरुवात एका राँग नंबरवरुन झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे ज्या मुलासोबत प्रेम प्रकरण जुळले तो मुलगा दहावीमध्ये शिकतो. तसचे तो सध्या दहावीच्या परिक्षेची तयारी करीत आहे. या दोघांची ओळख एका राँग नंबरवरुन झाली. ओळख झाल्यानंतर मुलाने महिलेला भेटण्यासाठी भभुआ तर कधी मोहनिया येथे बोलावून घेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलाच्या आणि महिलेच्या कुटुंबाने दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले.

अल्पवयीन मुलगा कुदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालपूर गावचा रहिवासी आहे. मागील दोन महिन्यांपासून फोनवर ते एकमेकांच्या संपर्कात होते. मुलाने महिलेला भेटण्यासाठी मोहनिया येथे बोलावून घेतले. या ठिकाणी त्यांच्यामध्ये दोन ते तीन वेळा शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. या महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबाला समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी महिलेला घरात ठेवण्यास नकार दिला.

कुटुंबाने नाकरल्यानंतर महिला अल्पवयीन मुलासोबत राहू इच्छिते. मात्र, अल्पवयीन मुलाने तिच्या सोबत राहण्यास नकार देत त्यांच्यामध्ये कधीही शरीरसंबंध निर्माण झाले नसल्याचा दावा केला आहे. तसेच महिलेने केलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले आहेत. महिलेने सांगितले की, चार महिन्यापूर्वी या मुलाने आपला नंबर कुठूनतरी मिळवला आणि त्यानंतर तो मला सतत फोन करुन लागला. सततच्या बोलण्यातून आमच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने मला भभुआ आणि मोहनिया येथे भेटण्यास बोलावून शरीरसंबंध निर्माण केले.

तर मुलाने सांगितले की, मला एक नंबर मिळाला होता. यानंबरवर मी बोलत होतो. मात्र, महिलेसोबत शरीरसंबंध निर्माण झाले नाहीत. पाहिजे तर माझी चौकशी करावी. चौकशीला मी तयार असल्याचे मुलाचे म्हणणे आहे. तसेच त्याने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला आहे. यामुळे आता दोघांना पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. आता महिला ज्या प्रकारे तक्रार देईल, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे मोहनियाचे पोलीस उपअधीक्षक रघुनाथ सिंह यांनी सांगितले.