खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलने केली मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी केली जागरूकता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलतर्फे खराडी येथील वूमन्स क्लबच्या सहयोगाने मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरुकता शिबिराचे आयोजन करण्यात आले. ६० हून अधिक महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. मदरहूड हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. सुवर्णा झिरपे यांनी मासिक पाळीदरम्यान करायची स्वच्छता आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान या संदर्भात चर्चा केली. या ठिकाणी उपस्थित असलेल्यांची मदरहूड हॉस्पिटलतर्फे माफक शुल्क आकारून पॅप स्मिअर चाचणी करण्यात आली आणि त्यांना सल्ला देण्यात आला.

जगभरात गर्भाशयाचा कर्करोग आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या पूर्वी ३० वर्षांवरील महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक होतेआता मात्र विशीतच हा आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध असणेकमी वयात लैंगिक संबंध ठेवणे आणि विषाणूच्या संसर्गामुळे (एचपीव्ही) गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. इतर घटकांमध्ये लैंगिक संबंध राखताना पुरेशी स्वच्छता न बाळगणेस्त्रीच्या गुप्तांगांची योग्य स्वच्छता न करणेसुयोग्य स्वच्छतागृहांची कमतरताअपुऱ्या स्नान सुविधा यांचा समावेश होतो.

मदरहूड हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. सुवर्णा झिरपे
म्हणतात
, “जगभरातील मुली आणि महिला निरोगी राहण्यासाठी मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखल्याने महिला आणि मुली आपल्या जीवनाचा पूर्ण क्षमतेने उपभोग घेऊ शकतातहे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

“लवकर निदान हा कर्करोगाशी लढा देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जीवनशैलीमध्ये झालेले बदलस्थूलपणाताण यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. या जागरुकता उपक्रमाच्या माध्यमातून आपण महिलांना लवकर निदान करणे आणि सतर्क असण्याबाबत माहिती देत आहोत. जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे महिलांनी गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लवकर निदान करण्यावर लक्ष दिले पाहिजे. उपचारांना किती यश मिळेलहे तुम्ही किती नियमित चाचणी करून घेताययावर अवलंबून असेल”.