विजेच्या धक्क्याने आई आणि मुलाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  –  शेतात विद्युत पंप चालू करण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा मृत्यू झाला. काल सायंकाळी अकोले तालुक्यातील गर्दनी शिवारात ही दुर्दैवी घटना घडली.

संगीता दिलीप झोळेकर (वय 40), आविष्कार दिलीप झोळेकर (वय16, दोघे रा. मूळ गर्दनी, हल्ली अमृतनगर, नवीन नवलेवाडी, अकोले) मयतांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दिलीप झोळेकर यांची गर्दनी शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यांची पत्नी संगीता व मुलगा अविष्कार हे काल शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते.

बराच वेळ उलटूनही मुलगा व पत्नी फोन उचलत नाही म्हणून झोळेकर गर्दनी गावातील नातेवाईकांना शेतात जाण्यास सांगितले. त्यांना झोळेकर यांच्या गर्दनी शिवारातील कतार पाइन येथे शेतात सायंकाळी 6.30 च्या सुमारास दोघांचेही मृतदेह आढळले. विजेच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी आढळून आले. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

एका महिन्यात घटवा ५ किलो वजन, करा ‘हे’ उपाय

पोट साफ होत नाही ? मग आवश्य करा हे घरगुती उपाय

योग्य प्रमाणात दही सेवन केल्यास आरोग्य राहिल उत्तम

विसरून जा आरोग्याचे जुने सल्ले, जाणून घ्या वास्तव