शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू ; अहमदनगर जिल्ह्यात ३ दिवसांत ८ बळी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू झाला. आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घडली. गेल्या तीन दिवसांत शेततळ्यात आठ जणांचे बळी गेले आहेत.

कमल बापू पानसरे (वय ३६) व मुलगी वर्षा बापू पानसरे (वय १६, दोघी रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) ही मयत मायलेकींची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, कमल पानसरे या गुरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यात दोरीच्या साहाय्याने हंडा घेऊन उतरल्या होत्या. दोर तुटल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना पाय घसरून मुलगी वर्षा ही पाण्यात पडली. दोघींचाही बुडुन मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने घारगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गेल्या सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात शेततळ्यात बुडून मयत होण्याच्या घटना घडल्या आहेत. तीन दिवसात आठ जणींचे बळी गेले आहेत. सर्व घटनांत मायलेकीच मयत झालेल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

आरोग्यासाठी मुलांना द्यावे ‘एग सलाद’, होतील ‘हे’ फायदे