आईच्या मैत्रिणीलाच बनवले गर्लफ्रेंड, दोघे लवकरच करणार आहेत लग्न

इंग्लंड: वृत्तसंस्था – अनेक रिलेशनशिपची प्रकरणे आपण पहिली असेल. इंग्लंडमध्ये मात्र एक विचित्रच रिलेशनशिपचे प्रकरण समोर आले आहे. २१ वर्षाचा मुलगा २३ किंवा २४ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडल्याचे आपण समजू शकतो मात्र तो चक्क ३६ वर्षाच्या महिलेच्या प्रेमात पडलाय. आश्चर्याची बाब म्हणजे, ती त्याच्या आईची अगदी जवळची मैत्रीण आहे. त्यांचे नाते कसे आणि केंव्हा जुळले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात,
२१ वर्षीय मुलाने असा प्रपोज केला ३६ वर्षीय महिलेला….. 
इंग्लंडमध्ये समोर आलेल्या विचित्र रिलेशनशिपच्या प्रकरणात 36 वर्षांची महिला आणि 21 वर्षांचा मुलगा लग्न करत आहेत. मुलाची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून त्याच्या आईची बेस्ट फ्रेंड आहे. मुलाने आईला सांगितल्यानंतर चक्क मुलाच्या आईनेच त्यांचे हे नाते जमवून दिले आहे. मुलाच्या आईने तिच्या बेस्ट फ्रेंडला सांगितले की, तू माझ्या मुलाला खूप आवडते, पहिल्यांदा हे ऐकल्यावर ती हसायला लागली होती. नंतर मात्र तिला देखील कळले नाही ती केंव्हा त्याच्या प्रेमात पडली.
कसे आले दोघे रिलेशनशिपमध्ये…. 
ही कथा आहे इंग्लंड येथील नॉर्थम्पटन परिसरात राहणाऱ्या लॉरेन गोरे आणि तिच्या 21 वर्षीय बॉयफ्रेंड रेयान एपल्टनची. तीन वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबे ‘मिल्टन-केनिस’ या शहरात शेजारी होते. त्या दरम्यान रेयानची आई सारा आणि लॉरेन या दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्याचवेळी आई साराच्या मदतीने या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. 2015 मध्ये साराने एक दिवस तिच्या घरी आलेल्या लॉरेनला सांगितले की,माझ्या मुलाला तू खूप आवडतेस हे ऐकून लॉरेन आश्चर्यचकित झाली आणि हसू लागली. काही दिवस उलटल्यानंतर लॉरेनने त्याला पहिले. यापूर्वी कधी त्याच्याकडे तिने निरखून पहिले नव्हते. ती निरखून पाहत असतांनाच रेयान तिला म्हणाला. मला तू खूप आवडतेस मी तुझ्याबरोबर राहण्याची माझी इच्छा आहे. त्यावेळी तिने रेयानला प्रथम नकार दिला व समजावले .की मी पाच मुलांची आई आहे. आपल्यात असे काही होऊ शकत नाही. तू फार लहान आहेस. नकार दिला असला तरी लॉरेनच्या मनात रेयानसाठी प्रेम निर्माण व्हायला सुरवात झाली. त्यानंतर तिने रेयानची आई साराकडून रीतसर परवानगी घेतली. आणि रिलेशनशिप पुढे वाढविण्याचा निर्णय घेतला.
या रिलेशनशिपनंतर कशी रिऍक्ट झाली लॉरेनची मुले…. 
लॉरेनने रेयान आणि आपण रिलेशनशिपमध्ये आहोत हे सुरुवातीला सिक्रेट ठेवले. कारण लॉरेनच्या  मोठा मुलापेक्षा रायन काही वर्षांनीच मोठा होता. त्यामुळे तो कसा  रिऍक्ट होईल आणि त्याला कसे समजवावे हे तिला कळत नव्हते. एक दिवस अचानक लॉरेनचा मुलगा कॅमरूनने दोघांना किस करताना पाहिले. आणि तो हसू लागला. हळू हळू सर्वांना रिलेशनशिपबाबद समजले. मुलांनी राग राग तर केला नाहीच सर्व दोन कुटुंब एकत्र येतील याच्या आनंदात ते होते. आता या दोघांचे नाते सामान्य नात्याप्रमाणे झाले असून लवकरच ते लग्न देखील करतील.
Loading...
You might also like