मनोरंजन

सनी लियोनी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘बत्तियां बुझा दो’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक वेगळी शैली असून तो चित्रपटात नाचताना फार कमी वेळा दिसतो. त्यानंतर आता त्याने डान्स केलेले आणखी एक गाणे रिलीज झाले असून यामध्ये तो सनी लियोनी हिच्याबरोबर नाचताना दिसून येणार आहे.

गाण्याच्या सुरुवात नवाजुद्दीन सिद्दीकी पासून होत असून यामध्ये तो आपल्या लूकमुळे त्रासलेला दिसून येत आहे. त्यानंतर सनी लियोनी हीच प्रवेश होत असून यामध्ये ती बोल्ड और ग्लॅमरस अवतारात दिसून येत असून नवाजुद्दीन तिला पाहून थोडा नर्व्हस होतो आणि त्यानंतर तिच्याबरोबर डान्स करू लागतो. गाण्याचे गीतकार कुमार असून ज्योतीक टांगरी आणि रामजी गुलाटी यांनी हे गाणे गायले आहे. यूट्यूबवर हे गाणे सध्या ट्रेंडमध्ये असून एका दिवसात तीन लाखापेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. मोतीचूर चकनाचूर या सिनेमातील हे गाणे असून या सिनेमाचे दिग्दर्शन देवमित्रा बिस्वाल यांनी केले आहे. 15 ऑक्टोबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

याआधी देखील नवाजने केला आहे डान्स
याआधी देखील नवाजने मुन्ना मायकल या सिनेमात डान्स केला असून यामध्ये त्याला लूक थोडा विचित्र दाखवण्यात आला आहे. या गाण्यामध्ये तो लाजत नाचताना दिसून येत आहे.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा

Back to top button