अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘मोतीचूर चकनाचूर’ सिनेमाला न्यायालयाची ‘स्थगिती’ ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘मोतीचूर चकनाचूर’ या सिनेमाच्या अडचणी कमी होत नाही असे दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, बिहार सिव्हील कोर्टाने ‘मोतीचूर चकनाचूर’ रिलीज होण्याला स्थगिती दिली आहे. बिहारच्या छपरा जिल्ह्याच्या एका लोकल डिस्ट्रीब्युटरने सिनेमाच्या राईट्सवर दावा केला आहे. त्यांनी या सिनेमाशी संबंधित दस्तऐवजही दाखवले आहेत.

अशा बातम्या समोर येताना दिसत आहेत की, सिनेमाचे प्रोड्युसर राजेश भाटीयांच्या विरोधात ड्युज क्लिअर करत नसल्याच्या तक्रारी आहेत. आधीच सिनेमाच्या रिलीज डेटवरून वाद सुरू होता. त्यामुळे हा सिनेमा 15 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार नाही. या सिनेमात नवाजुद्दीन सोबत सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी दिसणार आहे.

या सिनेमाचे लेखक देवमित्र बिस्वाल यांनी ड्युज क्लीअर न झाल्याने कोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहिती आहे. परंतु यानंतर कोर्टाने या सिनेमावरील स्थगिती हटवली होती. अथियाला अद्याप तिचं पूर्ण मानधन मिळालं नाही. सिनेमाच्या प्रोड्युसरने डायरेक्टर देबमित्राला काढून टाकलं होतं. देबमित्राने मुंबई उच्च न्यायालयात ट्रेलरवर स्थगिती आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मोतीचूर चकनाचूरच्या ट्रेलरवर स्थगिती आणली होती.

Visit : Policenama.com