सुनील शेट्टीची लेक ‘अथिया’च्या ‘मोतीचूर चकनाचूर’ चा ट्रेलर व्हायरल ! 2 दिवसात 96 लाख Views

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी स्टारर मोतीचूर चकनाचूर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी लिड रोलमध्ये आहे. लग्नाच्या कॉमेडीवर आधारीत हा सिनेमा आहे. देवमित्रा विश्वालने हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.

सध्या या सिनेमाचा ट्रेलर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांचा या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे प्रोड्युसरदेखील या प्रतिसादाने खुश आहेत. लग्नासाठी उतावळ्या असणाऱ्या नवऱ्याची भूमिका नवाजने साकारली आहे. ज्याचं वय खूप झालं आहे त्याला कशीही मुलगी हवी आहे. कॉमेडीचा छान तडका यात पाहायला मिळतो.

हा ट्रेलर इतका व्हायरल झाला आहे की अवघ्या दोनच दिवसात 96 लाखांहून अधिक लोकांनी आतापर्यंत हा ट्रेलर पाहिला आहे. 15 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी