Motorola चा फोल्डेबल 5G स्मार्टफोन झाला तब्बल 15 हजार रुपयांनी ‘स्वस्त’; जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Motorola या स्मार्टफोन निर्माता कंपनीने नुकतेच दोन हाय-एंड स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली होती. त्यानंतर आता कंपनीने फ्लॅगशिप स्मार्टफोन Moto Razr 5G च्या किमती कमी केल्या आहेत. Moto Razr 5G हा एक फोल्डेबल स्मार्टफोन आहे. कंपनीने दावा केला, की या समार्टफोनची किंमत 15,000 रुपयांनी कमी केली आहे.

Motorola कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला होता. त्यावेळी या स्मार्टफोनची किंमत 1,24,999 रुपये ठेवली होती. त्यानंतर आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किमती तब्बल 15,000 रुपयांनी कमी केल्या आहेत. असे जरी असले तरी Flipkart वर या स्मार्टफोनची किंमत जुनीच दाखवत आहे. त्यामुळे जर तुम्हाला नव्या किमतीत स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही ऑफलाईन रिटेल स्टोअर्सवर जाऊन खरेदी करू शकता.

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स –
डिस्प्ले –
6.2 इंच प्लास्टिक OLED फोल्डेबल. फ्लिप पॅनलवर सेकंडरी 2.7 इंचचा OLED डिस्प्ले.

प्रोसेसर – ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 765 G

RAM – 8 GB

कॅमेरा – 48 MP प्रायमरी तर सेकंडरी कॅमेरा स्क्रीनच्या टॉपवर. स्मार्टफोन फोल्ड होतो तेव्हा सेल्फी कॅमेरा. फोल्डेबल डिस्प्लेमध्ये हा 20MP चा कॅमेरा

बॅटरी – 2800 mAh, 15W TurboPower फास्ट चार्जिंग

सेंसर – फिंगरप्रिंट रिअर माउंटेड