मोटार सायकल पैशाच्या वादातुन तलवारीने मारहाण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मोटार सायकलचे पैसे देण्याच्या वादातून मौजे टणू ता. इंदापूर येथिल एकास तलवारीने मारहान केल्याची घटना दिनांक ३० डिसेंबर रोजी घडली आहे. याबाबतची फिर्याद सत्यवान दासु मोहिते रा. टणू, ता. इंदापूर, जि. पूणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असुन आरोपी विरोधात इंदापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की फिर्यादी सत्यवान मोहिते रा. टणू ता. इंदापुर यांचेकडे दिनांक ३० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांचा भाचा अक्षय विजय डाकले रा. दहिवडी, ता. माढा, जि. सोलापूर हा गहु घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी टणू येथे आला होता. त्यावेळी शंकर बाळासाहेब मोहिते रा. टणू, ता. इंदापूर हा फिर्यादीच्या घरी आला व फिर्यादीचा भाचा अक्षय यास शिवीगाळ करून मोटार सायकलचे पैसे दे नाहीतर तुझे हातपाय तोडतो असे म्हणाला व निघून गेला. त्यानंतर थोड्यावेळाने शंकर मोहिते, त्याचे वडील बाळासाहेब मोहिते व आई संगीता बाळासाहेब मोहिते हे फिर्यादीच्या घराजवळ आले व हातात दगड घेवून अक्षय यास मारहान करू लागले. त्यावेळी फिर्यादी सत्यवान मोहिते हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले असता, शंकर मोहिते यांने त्याचे हातातील चाकु सत्यवानच्या उजवे पायाच्या मांडीवर मारला. त्यावेळी सत्यवान याने सदरचा वार चुकवीला व चाकु त्याचे मांडीला घासुन गेला. त्यावेळी आजुबाजुच्या लोकांनी भांडणे सोडवीली.

अक्षय यास फिर्यादी सत्यवान  व त्याचा भाऊ लक्ष्मण मोहिते याचे मोटर सायकलवर ट्रीपल सीट बसवुन नरसिंगपूर रोडने बावडा चौकीकडे जात असताना बावडा चौकीच्या अलिकडे, रमाईनगर येथे आरोपी  शंकर मोहीते याचा मामा बाळासाहेब घोडे व त्याचे सोबत पाच ते सहा मोटार सायकलवर आलेले १० ते १२ लोकांना घेवुन येवुन आमचे मोटार रायकलला धडक देवुन तीघांना खाली पाडून मारहान केली. यावेळी फिर्यादीचा भाऊ यास दोन, तीन इसमांनी धरले व बाळासाहेब घोडे याने लम्क्षण याचे खीशातील मोबाईल व रोख ११ हजार रूपये काढून घेतले.व अक्षय याचा ४ हजार ७०० रूपये किमतीचा मोबाईल काढून घेतला व मारहाण केली. त्यातील एकाने लक्ष्मण याचे डोक्यात पाठीमागुन विट मारली. तर बाळासाहेब घोडे याने तलवारीने फिर्यादीच्या उजव्या हातावर मारून जखम केली व पोटालाही तलवारीने मारले व इतर १० ते बारा जणांनी लोखंडी राॅडने मारहान केल्याची फिर्याद सत्यवान दासु मोहीते याने इंदापूर पोलीसात दीली आसुन इंदापूर पोलीसांनी आरोपी शंकर बाळासाहेब मोहीते, त्याचे वडील बाळासाहेब मोहीते, व आई संगीता बाळासाहेब मोहीते. सर्व रा. टणु व इरोपी शंकर याचा मामा बाळासाहेब घोडे. रा. निमसाखर ता. इंदापूर, जि. पूणे व त्यांचे १०ते १२ इतर साथीदार यांच्या विरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.