सावधान ! रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास भरावा लागणार भरमसाठ ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत मंगळवारी मोटार वाहन (संशोधन) विधेयक – २०१९ मंजूर करण्यात आले. यात रस्ते सुरक्षेबरोबरच यात विविध तरतूदी आहेत. याशिवाय सरकार आता वाहतूकीचे नियम मोडल्यास कठोर दंडात्मक कारवाई करणार आहे. यात वाहन चालकाचे लायसन्स रद्द करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. तसेच गाडीची नोंदणी करण्याची तरतूद देखील आहे. यात अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता न दिल्यास दंडाची तरतूद हा होय.

अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता न दिल्यास १० हजाराचा दंड

या कायद्यात महत्वपूर्ण बदल करण्यात आला असून अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता न दिल्यास वाहन चालकांना ₹१०,००० चा दंड भरावा लागेल. ओवर स्पीड वर ₹१००० – २००० रुपयापर्यंत दंड भरावा लागेल. याशिवाय ड्रायविंग लायसन्सच्या नियमांचे उल्लघंन केल्यास कॅब चालकांवर ₹ १ लाख दंड भरावा लागेल. ओवरलोडिंग वाहन चालवल्यास ₹ २०,००० दंड भरावा लागेल.

लोकसभेत विधेयक पारित झाल्यानंतर जाणार राज्यसभेत

मोटर वाहन विधेयक २०१९ मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. यात सतत नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचे ड्रायविंग लायसेन्स रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वाहन देखील ६ महिन्यांसाठी जप्त करण्यात येईल. दारु पिऊन वाहन चालवणे, वेगाने वाहन चालवणे, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता न देणे, अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणे या संबंधी तरतुदी करण्यात आल्या आहेत. या विधेयक आता राज्यसभेत पारित होण्यासाठी पाठवण्यात येईल. यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. या विधेयकाने राज्यांच्या अधिकारावर कोणतीही बाधा आणण्याचा हेतू नाही. या तरतूदींना लागू करण्याची मर्जी राज्यांची असेल.

कलम, गुन्हा आणि नवीन दंड

१) १७७ : सामान्य दंड – ₹५००

२) १८१ : विना लायसन्स ड्रायविंग – ₹५,०००

३) १८३ : वेगाने वाहन चालवणे – ₹१,००० ते २,०००

४) १८४ : धोकादायक वाहन चालवणे – ₹५,०००

५) १८५ : दारु पिऊन वाहन चालवणे – ₹१०,०००

६) १९४ बी : सीट बेल्ट न लावता वाहन चालवणे – ₹१०००

७) १९४ डी : विना हेल्मेट – ₹१,००० दंड, ३ महिने लायसन्स रद्द

८) १९४ ई : रुग्णवाहिकेला रस्ता न देणे – ₹१०,००० 

आरोग्यविषयक वृत्त –