‘मोटार वाहन विधेयक 2019’ ला राष्ट्रपतींची मंजूरी ! RTO चे नवीन 19 नियम लागू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटार वाहन विधेयक २०१९ ला शुक्रवारी मंजुरी दिली. यामध्ये वाहन चालक परवाना व वाहनांचे नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिली. नवीन नियमनानुसार ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्याला आता कठोर शिक्षा होणार आहे.पात्र नसलेला व्यक्ती जर वाहन चालवताना अपघातग्रस्त झाला तर त्याच्या पालकांना ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे वाहन परवाना रद्द होऊ शकतो आणि आधी पेक्षा डबल दंड आता भरावा लागणार आहे.

नवीन कायद्यानुसार आता हे नियम होणार लागू

१) कलम १७८ नुसार आता बिना तिकीट प्रवास करणाऱ्याला ५०० रुपये दंड भरावा लागणार

२) कलम १७९ नुसार एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलेले नियम पाळले नाहीत तर २ हजार दंड भरावा लागणार

३) कलम १८१ नुसार बिना लायसन्स वाहन चालवल्यास भरावा लागणार ५ हजार दंड

४) कलम १८२ नुसार वाहन चालवण्यास पात्र नसूनही चालवल्यास १० हजार दंड भरावा लागणार

५) कलम १८३ नुसार ओव्हरस्पिड वाहन चालवल्यास १ हजार ते ३ हजारांपर्यंतचा दंड भरावा लागणार

६) कलम १८४ नुसार खतरनाक पद्धतीने वाहन चालवल्यास ५ हजार दंड भरावा लागणार

७) कलम १८५ नुसार दारू पिऊन गाडी चालवल्यावर १० हजार दंड भरावा लागणार

८) कलम १८९ नुसार स्पिडिंग /रेसिंग करणाऱ्यावर ५ हजारांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

९) कलम १९२ अ नुसार वाहनांची कागदपत्रे न काढता वाहन चालवल्यास १० हजार दंड भरावा लागणार

१०) कलम १९३ नुसार लायसन्स निगडित नियम तोडल्यास २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

११) कलम १९४ नुसार ओव्हरलोडिंग असेल तर २ हजार रुपये तर प्रति टन सामानानुसार २० हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

१२ ) कलम १९४ अ नुसार पॅसेंजर चे ओव्हरलोडिंग असेल तर १ हजार रुपये पर पॅसेंजर इतका दंड पडणार

१३) कलम १९४ ब नुसार आता सीट बेल्ट लावला नसेल तर १ हजार रुपये दंड भरावा लागणार

१४) कलम १९४ सी नुसार स्कुटर आणि बाईक वर दोन पेक्षा अधिक लोक असतील तर २ हजार दंड आणि तीन महिने परवाना रद्द होणार

१५) कलम १९४ डी नुसार विनाहेल्मेट २ हजार रुपये दंड आणि तीन महिने परवाना रद्द होणार

१६) कलम १९४ इ नुसार रुग्णवाहिकेसारख्या वाहनांना रस्ता न दिल्यास आता भरावा लागणार १० हजार रुपये दंड

१७) कलम १९६ के नुसार बिना इंशुरन्स वाहन चालवल्यास २ हजार इतका दंड भरावा लागणार आहे.

१८) कलम १९९ नुसार नाबालिक व्यक्तीने वाहन चालवल्यास वाहनाच्या मालकाला दोषी मानून तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

१९) अधिकाऱ्यांना मिळाले अधिकार – कलम १८३, १८४, १८५, १८९, १९०, १९४C, १९४D, १९४E वाहन परवाना सस्पेंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

त्यामुळे आता हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, बिना लायसन्स गाडी चालवणे अशा गोष्टी बदलाव्या लागतील अन्यथा भला मोठा दंड भरायला आणि मिळेल ती शिक्षा भोगायला वाहन चालकांना तयार रहावे लागेल.

आरोग्यविषयक वृत्त