पदमावती पुलावर बीआरटी मार्गात कार आणि दुचाकीची समोर समोर धडक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील पुलावर बीआरटी मार्गामध्ये आज संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकीस्वाराची समारोसमोर जोरदार धडक झाली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला व दुचाकीचेही नुकसान झाले. परंतु यानिमित्ताने सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्ग केंव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17467bed-cb1f-11e8-b4fe-e1e23ae03b96′]

सातारा रस्त्यावर आज संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कात्रज हुन स्वारगेट च्या दिशेने निघालेली मोटार कार पद्मावती पुलावर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली. अपघात प्रवण म्हणून कुख्यात असलेल्या पुलावरील या वळणावर धडकेचा जोरदार आवाज झाल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघात बीआरटी मार्गामध्ये झाल्याने तसेच या ठिकाणी बीआरटी मार्गाच्या दोन्ही बाजुला साडेतीन फुटापर्यंत भिंती उभारल्याने मदत करायला जाणाऱ्यानाही उड्या मारून जावे लागले. शेजारीच स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ बंदोबस्तासाठी असलेले पोलीस मदतीसाठी धावले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला व दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
[amazon_link asins=’B074L3VMJK,B075TDWXZK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28279ece-cb1f-11e8-a756-1b088c2973b0′]

 या पुलावर पद्मवतीच्या बाजूने खासगी प्रवासी बसेस चे पार्किंग आणि पिक अप पॉईंट आहे. बरेचदा बाहेरून येणाऱ्या बसेस या रस्त्यावर थांबतात. त्यामुळे कात्रजहुन स्वारगेट कडे जाताना कोंडी होते. अशातच बीआरटी मार्गाचे काम सुरू असल्याने खासगी वाहने थेट बीआरटी मार्गाचा वापर करतात. त्यामुळेच हा अपघात झालयाचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले. यानिमित्ताने बीआरटी मार्ग केंव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून महिला शिक्षकेची आत्महत्या