अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकी धडकून एकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मागे न पाहता अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकी धडकून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना कॉलेज येथील कॅन्टीन गेट समोरील रस्त्यावर १५ मार्च रोजी घडली. या अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू झाला. याप्रकऱणी कारचालकावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास कृष्णा नगरकर असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. वास्ताव डिसुझा (येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास नगरकर हे आयएलएस लॉ कॉलेज रस्त्याने त्यांच्या दुचाकीवरून १५ मार्च रोजी जात होते. त्यावेळी डिसुजा हा कार नो पार्किंगमध्ये लावून थांबलेला होता. त्याने मागे न पाहता वाहनाचा दरवाजा उघडला. त्याचवेळी मागून येणारे नगरकर यांची दुचाकी दरवाजाला धडकली आणि नगरकर हे खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला व हाता पायांना मार लागला होता. त्यानंतर त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान २० मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एन. निकम हे करत आहेत.

You might also like