फक्‍त 15 मिनिटात 7 तासाची बॅटरी चार्ज होणारा ‘हा’ पहिला मोबाईल भारतात ‘लॉंच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही जर तुमच्या मोबाईलला कंटाळला असाल किंवा नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर सध्या बाजारात चांगला मोबाईल कोणता आहे हे जाणून घ्या. अनेकजण मोबाईल नवीन घेतला की काही महिन्यातच मोबाईच्या समस्येला कंटाळतात. जसे की, मोबाईल हॅंग होणे, अचानक बंद पडणे, डिस्प्ले जाणे, बॅटरीचे प्रॉब्लेम असे अनेक बिघाड मोबाईलमध्ये जाणवू लागतात. मोबाईलमध्ये खूप काही महत्वाचा डेटा असतो जो की, आपल्याला तो नेहमी सांभाळून ठेवायचा असतो.

जसे की फोटो, व्हिडिओ, नंबर अशा अनेक गोष्टी असतात. ज्या आपल्या लक्षात राहत नाही म्हणून आपण मोबाईलमध्ये ते जपून ठेवतो. पण जर अचानक मोबाईलच्या समस्या जाणवू लागल्या तर मोबाईल दुसरा घेण्याचा विचार करतो. जर तुम्हाला नवीन आणि चांगला मोबाईल घ्यायचा असेल तर मोबाईलची सविस्तर माहिती घेऊनच मोबाईल घ्या. नुकताच एक मोटोरोलाच्या नवीन मोबाईलचा टिझर फ्लिपकार्टवर प्रदर्शित झाला आहे. जर तुम्ही हा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर याची सविस्तर माहिती लगेचच जाणून घ्या.

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मोबाईल म्हणजे मोटोरोला मोबाईल आता लवकरच भारतामध्ये लॉंच होणार आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला हवे असणारे अनेक फिचर्स असणार आहे. मोटोरोला वन व्हिजन मोबाईलच्या मागील बाजूस एफ / १.७ एपर्चरसह ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा मोबाईल २० जून रोजी एका कार्यक्रमात लॉंच होणार आहे.

नुकत्याच मोटोरोलाच्या नवीन मोबाईलचा टिझर फ्लिपकार्टवर प्रदर्शित झाला आहे. लवकरच तुम्हाला या फ्लिप्टकार्टवर मोबाईल विकत घेता येणार आहे. या मोबाईलने सिंगल कोर टेस्टमध्ये १,५९९ स्कोर केला आहे आणि मल्टी कोर बेंचमार्कमध्ये ५,३२८ इतका स्कोर केला आहे. या मोटोरोलाच्या नवीन मोबाईलची बॅटरी ३,५०० MH एतकी असणार आहे. त्यामुळे तुमच्या मोबाइलच्या बॅटरीचे टेन्शन आता दूर होणार आहे.

मोटोरोलाचा व्हिजन कसा असणार? जाणून घ्या

माटोरोलाचा वन व्हिजनमध्ये पंच होल डिस्प्ले असणार आहे. मोबाईलमध्ये ड्यू्अल कॅमेरा असणार आहे. एक कॅमेरा ४८ मेगापिक्सला आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. मोबाईलमध्ये ड्युअल एलईडी प्लॅश, ८x डिजीटल झीम, पोट्रेट मोड, मॅन्यूअल मोड, सिनेमाग्राफ, पॅनोरमा, अॅक्टीव्ह डिस्प्ले मोड व ऑटो एचडीआर फिचर आहे. त्याचबरोबर मोबाईलमध्ये २५ मेगापिक्सलचा कॅमेरा देखील आहे.

या मोबाईलमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व मायक्रोएसडी कार्डने ५१२ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकणार आहे. मोबाईलच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर मोबाईलची बॅटरी ३,५०० MH इतकी आहे. त्याचबरोबर ते फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

अवघ्या १५ मिनिटात सात तासाची बॅटरी चार्ज होणारा हा पहिला मोबाईल लॉंच होणार आहे. या मोबाईलमध्ये अ‍ॅण्ड्राइड ९ पाई ओएस असणार आहे. स्मार्टफोनमध्ये ड्यूअल सीम, ब्लू टूथ व्ही, वायफाय ८०२.११ एसी, एनएफसी, युएसबी टाइप सी पोर्ट आणि हेडफोन जॅक असणार आहे.

सिने जगत –

सलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’

‘BIG BOSS MARATHI’ या शोला ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट ? ‘या’ अभिनेत्रीने दिली धमकी

#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like