काय सांगता ! होय, 1 लाख 36 हजाराचा मोटोरोला फोन फक्त 2 मिनिटांमध्ये ‘आऊट-ऑफ-स्टॉक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोटोरोलाच्या Moto RAZR च्या स्मार्टफोनचे अपग्रेड व्हर्जन Moto RAZR 5G चा सेल नुकताच पार पडला. त्यावेळी Moto RAZR 5G चे सर्व फोन अवघ्या दोन मिनिटात विकले गेले. यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की फोनची किंमत ३०-४० हजार नसून तब्बल १ लाख ३६ रुपये आहे. फोनची किंमत महाग असून सुद्धा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून कंपनीने पुढचा सेल २१ सप्टेंबर ला ठेवला आहे.

याबाबत लेनोवाने माहिती प्रसिद्ध केली आहे. कंपनीने सांगितले की, Moto RAZR 5G इंडस्ट्रीचा एक्सक्लूसिव १०० हून अधिक पेटेंट्सचा स्टार ट्रॅक शाप्ट वापर करतो. या हिंज च्या मदतीने स्क्रीन कर्व्ड होवून फोल्ड होते आणि सातत्याने फोल्ड केल्यानंतर देखील फोन ओपन करताना डिस्प्ले फ्लॅट होतो. व वापर करण्यास सोपे जाते. Motorola RAZR 5G या फोनला २००,००० वेळा फोल्ड-अनफोल्ड केले जावू शकते. म्हणजे एखादा वापरकर्ता फोनचा उपयोग साधारण ५ वर्षे करु शकतो. या फोनमध्ये फ्लेक्सिबल स्क्रीनचा वापर वॉटरड्रॉप शेपमध्ये करता येतो. तसेच इलास्टिक मेटल स्ट्रक्चर डिस्प्ले ला ओपन केल्यास फ्लॅट ठेवतो.

Motorola RAZR 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये फोल्डेबल ६.२ इंचाचा ओलेड डिस्प्ले देण्यात आला असून, स्मार्टफोनच्या बाहेर सुद्धा दुसरी स्क्रीन देण्यात आली आहे. त्याची साईज २.७ इंच आहे. पॉवर फुल परफॉर्मन्स साठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७६५G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्याकरता २८००mAh बॅटरी दिली आहे. रॅम ८ जीबी तर इंटर्नल स्टोरेज २५६ जीबी देण्यात आलं आहे. तसेच १५ W फ्लॅश चार्जिंग चा सपोर्ट दिला आहे.