रेड साडीत मौनी रॉयचा ‘कहर’ ! जाणून घ्या किंमत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लहान पडद्यावरील सर्वांत सुपरहिट नागिन, अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नेहमीच आपल्या हॉट फोटोंनी कायमच अटेंशन घेत असते. जेव्हा मौनी बिकिनी घालते तेव्हा तिच्या हॉटनेसला चार चांद लागतात यात शंकाच नाही. पुन्हा एकदा तिचे काही फोटो समोर आले आहेत, जे चर्चेत आले आहेत. सध्या मौनीनं आपल्या साडीतल्या लुकमुळं लक्ष वेधून घेतलं आहे.

मौनी रॉयनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. या फोटोत मौनी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. मौनी रॉयचा बिंधास्त अंदाज पाहण्यासारखा आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं रेड कलरची साडी घातली आहे. चाहत्यांनाही तिचा अवतार खूप आवडला आहे. सध्या मौनीचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. मौनीच्या अनेक चाहत्यांनी फोटोंवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

मौनीच्या या आउटफिटची किंमत 30 हजार रुपये आहे. मौनीनं रेड साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तिनं सिल्व्हर कलरचा नेकपिस घातला आहे. रेड लिपस्टिक लावल्यानं तिचा लुक आणखी उठून दिसत आहे. ओपन हेअरमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 4 डिसेंबर 2020 रोजी रिलीज होणार होता. 2006 साली एकता कपूरची मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी मधून तिनं करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय अक्षय कुमारच्या गोल्ड या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला आहे. यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. केजीएफ, मेड इन चायना असे तिचे काही सिनेमे सांगता येतील. लंडन कॉन्फिडेन्शियल सिनेमात तिनं पहिल्यांदा रॉ एजंट म्हणून काम केलं होतं. नागिन या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

 

You might also like