अभिनेत्री मौनी रॉयच्या ‘लव्ह लाईफ’ची जोरदार चर्चा, बॉयफ्रेन्डसोबत थायलंडमध्ये बर्थडे ‘सेलिब्रेशन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉयला नवीन प्रेम भेटलं आहे असे समजत आहे. एका रिपोर्टनुसार, तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सूरज नंबियार आहे. सुरज दुबईत बँकर आहे. नकताच मौनी आपल्या बॉयफ्रेंडसोबत थायलंडमध्ये वाढिदिवस साजरा केला आहे.

अद्याप हे मात्र समोर आलेलं नाही की, हे दोघे कधी आणि कुठे भेटले आहेत. तिची मैत्रिण रुपालीने दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तेव्हापासून दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या. हा फोटो लगेचच डिलीट करण्यात आला होता.

डेटींगच्या वृत्तांवर बोलताना या सगळ्या अफवा असल्याचं मौनीने सांगितले होते. ती म्हटली होती की, नंबियार आणि फक्त मित्र आहोत हेच सत्य आहे. आम्ही सगळे मित्र आहोत. सगळे मिळून वाढदिवस साजरा करण्यासाठी थायलंडला गेलो होतो. मी अद्याप सिंगल आहे आणि सध्या आपल्या कामावर फोकस करत आहे.

रुपालीने त्यांचा फोटो डिलीट केला होता याबाबत जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा मौनी म्हणाली, “असं काहीच नाही.” यापूर्वी मौनी मोहित रैनासोबत रिलेशनशिपमध्ये होती. देवों के देव महादेव या मालिकेत दोघांनी काम केलं होतं. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगतात. मोहितच्या आधी मौनी गौरव चोपडा सोबत सिरियस रिलेशनशिपमध्ये होती.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर टीव्हीनंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. गोल्ड सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये आली होती. लवकरच ती मेड इन चायना सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती ब्रह्मास्त्र मध्येही झळकणार आहे. एकता कपूरच्या मेहरुनिशा या वेब सीरीजमधून ती डिजिटल डेब्यू करणार आहे.

visit : policenama.com