Mouni Roy थिरकली ’Patli Kamar’ गाण्यावर, हॉट डान्स Video इंटरनेटवर झाला Viral

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागिन अ‍ॅक्ट्रेस मौनी रॉय आपल्या हॉट आणि सेक्सी स्टाईलने नेहमीच फॅन्सला इम्प्रेस करताना दिसते. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणारी मौनी नेहमी आपले हॉट फोटोज आणि खास व्हिडिओ शेयर करून फॅन्सला एंटरटेन करत असते. आज तिने आपला एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती आपल्या सेक्सी स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

मौनी या व्हिडिओमध्ये तनिष्क बागचीचे गाणे ’पतली कमर’ वर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती ब्लू कलरची ट्रॅक्ट पँट्स आणि ब्रा घालून आपल्या हॉट स्टाईलमध्ये डान्स करत आहे. फॅन्सला तिची ही स्टाईल खुप पसंत पडत आहे आणि लोक त्यावर कमेंट करताना तिचे कौतूक सुद्धा करत आहेत.

छोट्या पडद्यावर आपले सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांना भुरळ घातल्यानंतर मौनीने अक्षय कुमारचा चित्रपट ’गोल्ड’ मधून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला होता. ती लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चनची भूमिका असलेला चित्रपट ’ब्रह्मास्त्र’ मध्ये सुद्धा दिसणार आहे.