मौनी रॉयनं ऐश्वर्या रायच्या गाण्यावर केला डान्स ! व्हायरल होतोय व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लहान पडद्यावरील सर्वात सुपरहिट नागिन अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच आपल्या हॉट फोटोंनी अटेंशन घेत असते. मौनीनं बिकिनी लुकनं अनेकदा सोशलवर राडा घातला आहे. जेव्हा मौनी बिकिनी घालते तेव्हा तिच्या हॉटनेसमध्ये अजूनच भर पडते. सध्या मौनी आपल्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. मौनीनं ऐश्वर्या रायच्या फेमस गाण्यावर तिच्याच स्टाईलमध्ये डान्स केला आहे. सध्या या व्हिडीओची खूप चर्चा होत आहे.

मौनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मौनी ऐश्वर्या रायच्या ताल सिनेमातील ताल से ताल मिला या गाण्यावर काही स्टेप्स करताना दिसत आहे. तिनं ऐश्वर्याच्याच स्टाईलमध्ये डान्स केलेला पाहून साऱ्यांनीच तिला अटेंशन दिलं.

मौनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. काही तासातच व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या डान्स स्टेप्सचं कौतुकही केलं आहे.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 4 डिसेंबर 2020 रोजी रिलीज होणार आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like