Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने मालिकाविश्व आणि चित्रपटविश्व हे दोन्ही देखील जबरदस्त गाजवले आहे. मौनीने आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अदांनी या इंडस्ट्रीमध्ये विशेष स्थान कमावले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग असून मौनीच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील मौनी सक्रिय असून ती तिचे हॉट फोटोशूट (Mouni Roy Hot Photoshoot) शेअर करायला कधीही विसरत नाही. यावेळी देखील तिच्या फोटोशूटची चर्चा सर्वत्र रंगली असून अनेकांना तिचे हे बिकिनी फोटो (Mouni Roy Bikini Photo) आवडले आहेत. मात्र हे फोटो अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने मालदीवमध्ये काढले असून तिच्या या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे.

अभिनेत्री मौनी रॉय ही अनेक मालिकांमध्ये (Mouni Roy Serials) झळकली आहे. मालिकांमुळे तिची घराघरात ओळख निर्माण झाली आहे. तिच्या दिलखेचक अदांनी ती प्रेक्षकांची मने जिंकते. सध्या मौनी ही मालदीवमध्ये (Mouni Roy In Maldives) व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून कॅमेऱ्यासमोर अनेक आकर्षक पोज दिल्या आहेत. तिच्या या बिकिनीला निळ्या रंगाची लेस आहे. यावेळी तिने लाईट मेकअप केला असून केसांच्या दोन वेण्या घालून हेअरस्टाईल केली आहे. तिच्या या फोटोखाली चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री मौनी रॉय हिचे हे बिकनी फोटो व्हायरल झाले असून तिच्या अदांवर नेटकरी घायाळ झाले आहे.

अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असल्या तरी तिच्या बोल्डनेस (Mouni Roy Boldness) मुळे तिची जास्त चर्चा रंगलेली दिसते. अभिनेत्री मौनी रॉय हिने ‘मेड इन चायना’ (Made in China), ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra), ‘गोल्ड’ (Gold) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने ‘नागिन’ (Naagin), ‘देवों के देव…महादेव’ (Devon Ke Dev…Mahadev) या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘नागिन’ या मालिकेतील मौनीची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. सध्या तिच्या फोटोशूटच्या चर्चा रंगल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kartikey Malviya – Ragini | अभिनेता कार्तिकेय मालवीयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, सचिन कांबळे दिग्दर्शित ‘रागिनी’ गाणं प्रदर्शित!

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना