थोडक्यात बचावली अभिनेत्री मौनी रॉय (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय हिच्यासोबत एक गंभीर घटना घडली आहे. अभिनेत्री मौनी ‘मेड इन चायना’ चित्रपटाच्या लॉंच कार्यक्रमासाठी निघाली होती तेव्हा मुंबईतील जुहू परिसरामध्ये मेट्रोच्या बांधकामामुळे मौनी रॉयच्या गाडीवर मोठा दगड पडला. या अपघातामध्ये कोणतीच हानी झाली नाही. गाडीचे नुकसान झाले आहे.

मौनीने घडलेल्या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करुन ही माहिती दिली. तिने लिहले की, ‘जूहू सिग्नलला गाडी थांबताच ११ व्या मजल्याच्या उंचीवरुन एक दगड पडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे मला काही करता आले नाही. जर गाडी थोडी पुढे असती तर किती मोठा अपघात घडला असता. मुंबई मेट्रोच्या या निष्काळजीपणामुळे खूप मोठा अपघात घडला असता.’

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की, अभिनेत्री मौनी रॉय थोडक्यात वाचली आहे. मौनी रॉय याआधी अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ चित्रपटात दिसली होती. तिचा आगामी चित्रपट ‘मेड इन चायना’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडला आहे.

 

You might also like