Mouni Roy – Suraj Nambiar Liplock | पार्टीमध्ये स्विमिंग पूलच्या किनारी सगळ्यांसमोर केलं मौनी रॉय आणि सुरज नांबियारनं LipLock; व्हिडिओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय नुकतीच लग्न बंधनात अडकली. मौनीनं प्रियकर सूरज नांबियारसोबत 27 जानेवारीला लग्न केलं. मौनीनं (Mouni Roy) नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Mouni Roy – Suraj Nambiar Liplock) पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लग्नानंतर पती सुरज आणि ती काही मित्रांसोबत पूल पार्टी एन्जॉय करत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.

 

या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम मौनी आणि तिचा पती (Suraj Nambiar) मस्ती घालताना, डान्स करताना, ड्रिंक्स घेताना दिसत आहे. मात्र नंतर अचानकपणे मौनी आणि सुरजच्या मध्ये लिपलॉक (Mouni Roy – Suraj Nambiar Liplock) होतं. लग्नानंतर या दोन्ही कपलनं मित्र आणि परिवारासाठी एक पूल पार्टी ठेवली होती. त्यामध्ये सगळ्यांनी बीच आऊटफिट परिधान केलं होत. तसेच सूरज पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि शर्ट मध्ये दिसून आला. या पूल पार्टीमध्ये मीत ब्रोस, मंदिरा बेदी, अर्जून बिजलानी यांसोबत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. व्हिडिओमध्ये सुरज त्याच्या मित्रांसोबत पूलमध्ये भिजताना आणि फोटो काढताना दिसत होता. तर अचानकपणे शेवटी मौनी सुरजसोबत लिपलॉक करतानी व्हिडिओ मध्ये दिसली.

दरम्यान, मौनी (Mouni Roy) आणि सुरजच्या लग्नानंतरच्या व्हिडिओ आणि फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तिच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. मौनीनं लग्नामध्ये लाल रंगाची बनारसी साडी नेसली असून, लग्न बंगाली आणि मल्याळी परंपरेनुसार पार पाडण्यात आलं.

Web Title :- Mouni Roy – Suraj Nambiar Liplock | mouni roy suraj nambiar liplock near swimming pool in party video viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा