मौनी रॉयनं अंडरवॉटर स्विमिंग करत साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशचा आनंद घेत आहे. नकतीच मौनी आपल्या एका नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली होती. या फोटोंमध्ये मौनी कमालीच बोल्ड दिसत होती. कारण मौनी या फोटोत टॉपलेस दिसत होती. यानंतर आता मौनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो चर्चेत आला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत मौनी अंडरवॉटर स्विमिंग करताना दिसत आहे. समुद्राच्या पाण्यात मौनी पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. समुद्री जीवांसोबत मौनी स्विमिंग एन्जॉय करताना दिसत आहे.

मौनीनं अंडरवॉटर काही फोटोही शेअर केले आहेत. आपल्या फोटो आणि व्हिडीओला मौनीनं खास कॅप्शन दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “Happy Love Day.” मौनीच्या या फोटो आणि व्हिडीओवर तिचे सेलिब्रिटी मित्र अर्जुन बिजलानी, रौशनी चोपडा आणि साजिद नाडियाडवाला यांनीही कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनीही तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

https://www.instagram.com/p/B8gHzu6pyTR/