‘माउंट एव्हरेस्ट’ची उंची वाढली, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – जगातील सर्वांत उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर करण्याची प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. २०१५ मध्ये झालेल्या भूकंपाने नेपाळ हादरले होते. या नैसर्गिक संकटामुळे भूगर्भात बरीच उलथापालथ झाल्याने एव्हरेस्ट शिखराची आताची सर्वमान्य उंची कायम राहिली असेल की नाही, या शंकेने नेपाळ सरकारला घेरले. त्यातूनच एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्याचे काम तेथील सरकारने हाती घेतले. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून चीनच्या साह्याने काम सुरू होते. आता एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर असल्याचे त्यातून समोर आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एव्हरेस्टची उंची कमी झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता ती फोल ठरली आहे.

एव्हरेस्ट शिखराचा वेध…
भारतीय व युरेशियन भूस्तराच्या टकरीतून एव्हरेस्टची निर्मिती
१९५४ मध्ये ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ने ही उंची निश्चित केली होती
०.५ मीटर दर १०० वर्षांनी वाढणारी एव्हरेस्टची उंची
५० दशलक्ष वर्षे जुने शिखर
के २ : दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर
(हे शिखर चीन व पाकिस्तान यांच्या सीमारेषेवर आहे)

युरोपमधील सर्वोच्च शिखरे
माउंट एल्ब्रस : ५,६४२ मीटर, कॉकेशस पर्वतराजीत स्थान
माउंट ब्लांक : ४,८०८ मीटर, आल्प्स पर्वतराजीत स्थान
माउंट मॅटरहॉर्न : ४,४७८ मीटर, आल्प्स पर्वतराजीत स्थान

जगातील सर्वांत लहान शिखर : माउंट विचप्रूफ, ऑस्ट्रेलिया (१४८ मीटर)