दिव्यांका त्रिपाठीच्या काकीचे कोरोनामुळं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसची दुसरी लाट देशभरात पसरली आहे. रोज कित्येक लोकांचा बळी जात आहे. कोरोनाचा खूप मोठा परिणाम टेलिव्हिजन आणि बॉलिवूडवरही झाला आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मालिका व चित्रपटांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. दरम्यान टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची काकी राखी त्रिपाठीचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे.

दिव्यांका त्रिपाठी सध्या क्राइम पेट्रोल शो होस्ट करत होती. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आलेल्या सीरिजमध्ये दिव्यांका सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत होती. मात्र काही दिवसांपूर्वी दिव्यांकाने या शोचे शूटिंग संपवले आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर करून सांगितले होते.

दिव्यांका त्रिपाठीच्या काकीचे निधन झाल्याची माहिती अभिनेत्रीची आई नीलम त्रिपाठीने सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी फेसबुक एक पोस्ट शेअर करत लिहिले की, माझ्या जाऊ राखी त्रिपाठी यांना स्वर्गवास झाला आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी घरी रहा, सुरक्षित रहा. आतापर्यंत दिव्यांकाने या वृत्तावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.