उंदराच्या तोंडाला लागली नशा करण्याची लथ, शेतातील गांजाचे पानं जास्त खाल्ल्यामुळं झाला बेशुध्द

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गांजाबद्दल तुम्हाला माहिती असेलच की, बरेच लोक नशा करण्यासाठी त्याचा वापर करतात. गांजाचा नशा केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही आवडतो. एका उंदरास त्याची चटक लागली आणि ते जास्त प्रमाणात घेतल्यामुळे तो तेथेच बेशुद्ध पडला. ही घटना कॅनडाची आहे जिथे एका व्यक्तीच्या घरातून सतत गांज्याची झाडे चोरी जात होती. एके दिवशी त्याने पाहिले की, त्याच्या छोट्याशा शेतातच उंदीरांने गांज्याची इतकी पाने खाल्ली, ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. दरम्यान, कॅनडामध्ये लोकांना त्यांच्या घरात निश्चित प्रमाणात गांजा लावण्याची परवानगी आहे.

कॉलिन नावाच्या व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट फेसबुकवर या संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्याने चित्रे सामायिक करताना लिहिले, दोन दिवस हा छोटा उंदीर त्याच्या गांजाच्या पानांची चोरी करून घेऊन जात होता. हे तो बेशुद्ध होईपर्यंत घेत होता. या चित्रात स्पष्टपणे दिसत आहे की, उंदीर ही गांज्याची पाने खाल्ल्यानंतर उलट बेशुद्ध पडला.

कॉलिनच्या पोस्टनुसार, उंदीर एका आठवड्यात गांजाच्या आहारी गेला होता. त्याने उंदीर जंगलात सोडण्याचा विचार केला, परंतु तरीही उंदीर तिथे पोचला कारण त्याला भांग खूप आवडला.