अभिनेत्री मोसमी चॅटर्जींच्या मुलीचं निधन, वर्षभरापासून कोमात होती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेत्री मोसमी चॅटर्जी यांच्या मुलीचं निधन झालं आहे. पायल डिकी सिन्हा असं तिचं नाव असून पायल दीर्घआजारानं मरण पावली आहे. 2017 पासून पायलची तब्येत बिघडत होती. अनेकदा तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. गुरुवारी मध्यरात्री पायलनं अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

गेल्या वर्षभरासापासून पायल कोमात होती. हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर पती डिकी सिंह पायलची योग्य पद्धतीनं काळजी घेत नसल्याचाही आरोपही मोसमी यांनी केला होता. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत असल्यानं पती डिकीनं पायलवरील उपचार बंद केल्याचा आरोपही मोसमी यांनी केला आहे. पायलनं 2010 साली बिजनेसमन डिकी सिंह सोबत लग्न केलं होतं. काही दिवसांनंतर मात्र त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता. यानंतर ती कोमात होती.

पायल आणि डिकी यांच्यातील वाद वाढत असताना मोसमी आणि त्यांच्या पतीनं डिकी विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. इतकेच नाही तर पायलची देखभाल करण्यासाठी पालकांना संमती देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली होती. पायलच्या निधनानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. निकटवर्तीयांकडून श्रद्धांजली अर्पण केली जाताना दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like