तोंडातून येणार्‍या दुर्गंधीला सहजतेनं नका घेवू, होवू शकतात गंभीर आजार, जाणून घ्या ‘लक्षणं’ आणि ‘उपाय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुंदर चेहऱ्यासोबत सुंदर दात असणं चांगली गोष्ट आहे पण जर तोंडातून दुर्गंधी येत असेल तर कोणी जवळ बसणं तर लांबच कोणी बोलणार देखील नाही. कधीकधी दात चांगले घासूनही तोंडातून दुर्गंधी येते. खरंतर याचं कारण आरोग्याशी संबंधित आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे तोंडातून येणारी दुर्गंधी म्हणजे एखाद्या आजाराच्या आधी मिळालेला इशारा आहे. जर तुम्हाला ही समस्या असेल तर याचं कारण काय असू शकतं आणि यावर उपाय काय?

दुर्गंधी येण्याचे कारण

तोंडातून दुर्गंधी येण्याचे अनेक कारणं असू शकतात, त्यामध्ये ओरल इन्फेक्शन, फास्ट फूडचे अधिक सेवन, तोंडाचा कोरडेपणा किंवा नशा करणे अशी कारणं असू शकतात. आपल्या तोंडातील लाळ दातांना अनेक आजारापासून दूर ठेवते. लाळेच्या कमतरतेमुळे दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात.

– तुम्ही जे काही खाता ते खात असताना जरा जपून खा. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तोंडाचा वास येऊ शकतो असं वाटल्यास तो खाणं टाळा.

– धूम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याच्या सेवनाने तोंडाची दुर्गंधी येते. धूम्रपान केल्यामुळे तोंड कोरडे पडते आणि तोंडातून अधिकच दुर्गंधी येऊ शकते.

– जर तुमच्या तोंडातील दुर्गंधी कमी होत नसेल तर तुम्हाला सायनस, किंवा तोंडाशी, घशाशी संबंधित कोणता गंभीर आजार असू शकतो. कमी पाणी पिणे, श्वास घेण्यास त्रास होणे, क्रोनिक ब्रोकाइटीस, टॉन्सिल हे आजार असू शकतात ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते.

तोंडाची दुर्गंधी येण्याची लक्षणं

– बलगम येणे
– नाक वाहणे
– दात कमजोर होणे
– हिरड्यांना सूज येणे
– ब्रश करताना रक्त येणे
– ताप चढणे आणि उतरणे
– खूप दिवस खोकला येणे
– सतत तोंड येणे

खूप पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. पाणी कमी पिल्याने श्वासाच्या समस्या, पचनाशी संबंधित समस्या, पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. वेळेवर अन्नाचे पचन झाले नाही तर तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.