“मुखडा… हीचा मुखडा, जणू चंद्रावणी खुलला…”; ‘हा’ Video बघून सोनाली कुलकर्णीच्या प्रेमात पडले लोकं

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   महाराष्ट्राची अप्सरा, अर्थात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या नवनवीन लूकमुळे चर्चेत असते. कोणत्याही लुक मध्ये सोनाली चाहत्यांच लक्षवेधून घेताना दिसते. सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असणारी सोनाली नेहमीच तिच्या सेटवरील व्हिडिओज किंवा फोटोज शेअर करताना दिसते.नुकताच सोनालीनं तिच्या सुंदर साडीतील एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओतील सोनालीच्या हास्यावर आणि तिच्या अदांवर चाहते पूर्ण घायाळ झालेत. तिनं केलेला पारंपारिक लूकला चाहत्यांनी खूपच पसंती दर्शवली आहे.

आता लवकरच सोनालीचा झिम्मा हा चित्रपट रिलीज होणार आहे.. कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. तर ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे दोन चित्रपट सुद्धा सोनालीनं साईन केले आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिलीये.

या मराठमोळ्या अभिनेत्रीने आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्व आणि स्थान निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिल्यानंतर ‘ग्रँड मस्ती’ या सारख्या हिंदी चित्रपटातही काम केले.