Mouth Ulcers Causes And Treatment | तोंडात सारखे फोड येतात का?, मग ‘या’ गंभीर आजारांमुळं देखील होऊ शकते समस्या, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mouth Ulcers Causes And Treatment | स्त्री असो की पुरूष तोंडातील फोडांच्या समस्येने सगळेच त्रस्त असतात. कधीतरी. जीभेच्या मागील बाजूस, ओठात किंवा जबड्यात उद्भवणारे हे घाव खूप वेदनादायी असतात. जेव्हा फोड येतात तेव्हा अन्न गिळणे आणि पाणी पिणे खूप कठीण होऊन बसते. सर्वसाधारणपणे पोटाच्या उष्णतेमुळे किंवा ज्यांचे पोट स्वच्छ नसते, त्यांना तोंडाचे अल्सर (Mouth Ulcers) होतात. परंतु जर आपल्याला बर्‍याचदा फोडांचा त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा. काही सोपे घरगुती उपाय करून किंवा औषधाचे एक-दोन डोस घेऊन फोड बरे होतात, पण अनेकदा हा त्रास होत असेल तर त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. बर्‍याच लोकांना अचानक हिरड्यांना दुखापत झाल्यामुळे किंवा ब्रश करताना तोंडात संसर्ग झाल्यामुळे फोड येतात. या अवस्थेबद्दल अधिक जाणून घेऊया (Mouth Ulcers Causes And Treatment).

 

तोंडाच्या अल्सरची लक्षणे (Symptoms Of Mouth Ulcers) :
तोंडातील अल्सर सहजपणे ओळखला जाऊ शकतो. ही सहसा आपल्या ओठ, हिरड्या, जीभ, आतील गाल किंवा तोंडाच्या वरच्या भागात लहान जखम दिसते. फोडांच्या काठाभोवती लाल वर्तुळे असू शकतात. फोडांभोवती सूज येणे. ब्रश करताना वाढते दुखणे. तिखट, खारट किंवा आंबट पदार्थ खाताना तीव्र वेदना होतात (Mouth Ulcers Causes And Treatment).

 

फोड येण्याची कारणे (Causes Of Blisters) :
तोंडात फोड येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. या जखमा वाढण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात.

जेवताना चुकून आपला गाल किंवा जीभ चावली जाते.

व्हिटॅमिन-बी १२ ची कमतरता.

टूथब्रश बरोबर नसणे किंवा टूथपेस्ट सूट न होणे.

संत्री, अननस आणि स्ट्रॉबेरी सारख्या आम्लयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करणे.

पीरियड्स दरम्यान हार्मोनल बदल.

तणाव, झोपेचा अभाव.

तोंडात व्हायरल, बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्ग.

वारंवार फोड येण्याची समस्या (Recurrent Blisters Problem) :
जर आपल्याला वारंवार फोडाची समस्या येत असेल तर ही समस्या गंभीर असू शकते. ज्यासाठी लवकर वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. तोंडाच्या अल्सरचेही हेच लक्षण असते. अशा वेळी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.

 

सेलिआक रोग (Celiac Disease) :
मधुमेहाच्या आजाराची कारणे. बेशेट रोग (या अवस्थेत संपूर्ण शरीरात सूज येते). रोगप्रतिकारक शक्तीचा कमकुवतपणा, ज्यामुळे विषाणू आणि जीवाणू तोंडाच्या पेशींवर हल्ला करतात.

 

एचआयव्ही/एड्स (HIV / AIDS).

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता (Vitamin B12 Deficiency) :
एनएचएसच्या अहवालानुसार, जर आपल्याला वारंवार फोड येत राहिले तर ते व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. लाल रक्तपेशी तयार करण्याबरोबरच आपली मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि अन्नातून ऊर्जा मिळविण्यासाठी या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. ज्या लोकांना याची कमतरता असते त्यांना बर्‍याचदा फोडांची समस्या उद्भवू शकते. वारंवार फोड येण्याच्या समस्येसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Mouth Ulcers Causes And Treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Latest Study | मृत व्यक्तीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते? अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयोगाने जगाला आश्चर्याचा धक्काच बसला

 

Blood Sugar Control Tips | ब्लड शुगर वाढल्यास अवश्य प्या हे पाणी, रूग्णांना होईल फायदा; जाणून घ्या

 

Asthma Symptoms | फुफ्फुसात जमा कफ काढतात ‘या’ 4 आयुर्वेदिक वनस्पती; सूज-श्वासाच्या कमतरतेपासून मिळतो आराम