‘माऊथ वॉश’च्या वापरामुळं टाळता येऊ शकतो ‘कोरोना’चा संसर्ग, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरूच आहे. भारतात तर पाचवेळा लॉकडाऊन वाढवूनही अद्याप कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आलेले नाही. त्यातच लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने कोरोना रूग्णांमध्ये प्रचंड वाढ सुरू झाली आहे. अशावेळी नागरिकांना जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरच्या वापरासह इतर वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे आहे. माऊथ वॉशचा वापर केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यात मदत होऊ शकते, असा दावा कोरिया युनिव्हर्सिटीने केला आहे. जर्नल ऑफ कोरियन मेडिकल सायन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

संशोधनातील महत्वाचे मुद्दे

1  लाळेमार्फत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. तसेच रूग्णाच्या शिकंण्यातून खोकण्यातून किंवा बोलण्यातून संसर्गाचा धोका असतो. यावर माऊथवॉश परिणामकारक ठरू शकते.

2  क्लोरहेक्सिडीन माऊथवॉशमुळे काही तास लाळेतील कोरोना व्हायरसचे प्रमाण कमी होऊ शकते.

3  माऊशवॉशने गुळण्या केल्यास लाळेतील व्हायरसचे प्रमाण 2 तासासाठी कमी होते. व्हायरसच्या प्रसारचा धोका कमी होतो.

4  होम क्वारंटाईन असलेल्यांनी, बाहेरून आलेल्या व्यक्तींनी, रुग्णांनी दर 1 ते 2 तासांनी माऊवॉशने तोंड स्वच्छ करावे.

डेंटिस्ट, ईएनटी, ऑप्थमोलॉजी आणि फिजिशिअन्सनीदेखील रुग्णांना माऊथवॉशने गुळण्या करून येण्यास सांगावे. यामुळे आरोग्य विभागातील व्यक्तींचा धोका कमी होईल.