श्रीगोंद्यात धरणे आंदोलन अन् खुर्चीला हार, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘गांधीगिरी’

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेडगाव व राशीन रस्त्यावरील सरस्वती नदीचा पूल व पेडगाव ते श्रीगोंदा रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी यासाठी श्रीगोंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. उपाभिंयता अरविंद अंपलकर हे कार्यालयात न आल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

पेडगाव श्रीगोंदा रस्त्याची व पेडगाव राशिन रस्त्यावरील सरस्वती नदीच्या पुलांची अवस्था अत्यंत दुरावस्थेत झाले आहे यामुळे नागरिकांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागते असा आरोप प्रशांत ओगले यांनी केला.

यावेळी वरिष्ठ लेखनिक यांनी दि 21 नोव्हेंबर अखेर श्रीगोंदा पेडगाव रस्ता दुरुस्तीचे काम पुर्ण करणार असे लेखी आश्वासन दिले. जर काम पुर्ण नाही झाले दि 22 नोव्हेंबर पासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

याप्रसंगी कैलास खेडकर, डॉ. गोरख बायकर, मल्लूभाई शेख , मुजफ्फर मालजप्तॆ, गणेश पवार, सचिन गायकवाड, विकास काळे, नवनाथ तनपुरे, प्रवीण ढगे, अनिल कणसे, नितीन खेडकर, किरण दरेकर, ताहीर शेख, योगेश शेळके, नितीन कणसे, शफिक हवालदार, हसन आतार, दादा काटकर, भाऊ गावडे, अजित भोसले, अमोल भोसले, नितीन क्षिरसागर, निलेश उबाळे, तेजस खेडकर, अक्षय आठवले, संदीप वागस्कर, प्रशांत सिदनकर, विशाल पवार, स्वप्निल रेवगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Visit : Policenama.com