स्मरण महात्म्याचे… मूक आंदोलन जनसामान्यांचे..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसनकडून आज पुण्यात मूकमोर्चांचं आयोजन करण्यात आले.. पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात  धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे. तोंडावर पट्टी बांधून मूक आंदोलन यावेळी करण्यात आले. शांततेत कुठलेही भाषण न करता हे आंदोलन करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d93e9df-c60b-11e8-a2e9-edc725ab4f94′]

स्मरण महात्म्याचे… मूक आंदोलन जनसामान्यांचे… अशी टॅग लाईन यावेळी देण्यात आली होती.

पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन सुरू आहे. अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांचा आजपासून महाराष्ट्रव्यापी दौरा सुरू होत आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्याच ठिकाणी सरकारच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात येईल, त्यानंतर त्या दौऱ्यासाठी रवाना होतील.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76aa9253-c60b-11e8-baa3-f7f932c53ec1′]

सत्य, अहिंसा, शांती ही गांधीजींची तत्वे होती तर असत्य, हिंसा, अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्व असल्याची टीका यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या तत्वांची उदाहरणे सुद्धा यावेळी देण्यात आली. यात सरकारकडून सांगण्यात आलेले असत्य म्हणजे, राफेल विमान बनविण्याची एच ए एल कंपनीची क्षमता नाही. हिंसा म्हणजे, विचारवंतांच्या हत्येस जबाबदार सनातन संस्थेवर अद्याप बंदी नाही. अशांती म्हणजे देशाच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात आली नाही असे एका फ्लेक्सच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्याचबरोबर जवाब दो असे लिहून विविध प्रश्न करणारे फलक हातात धरण्यात आले होते.

जाहिरात