पाथरी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – पाथरी येथील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पाथरी तहसीलवर शुक्रवारी 28 जुन रोजी दुपारी दोन वाजता शहरातील चौक बाजार येथुन मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालया समोर धरने प्रदर्शन करण्यात आले.

देशभरात मुस्लिम समाजाच्या विरोधात होत असलेल्या (माॅबलिंचिंग) जमावा कडून हत्येच्या घटनांना आळा घातला पाहिजे व घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यत यावी अशा मागणीचे निवेदन मा.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रभारी तहसीलदार के.वी.वाघमारे यांच्या मार्फत देण्यात आले. झारखंड राज्यातील तबरेज अन्सारी या युवकाला जमावाद्वारे झाली मारहाण व पोलीसांचा निष्काळजीमुळे तरुणांचा नाहक बळी गेला. या घटनेचा योग्य तपास होऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सर्वधर्मातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मुक मोर्चा आयोजित करण्यात आला होता . यावेळी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सहभाग नोंदविला. यावेळी अब्दुल नदीम अन्सारी, शेख खुर्शीद, मौलाना मौहम्मद खमरुदीन नदवी, अल्ताफ अन्सारी, इमरान अहेमद अन्सारी, हाफिज जब्बार, जुबेर खान, दशरथ शिंदे पाटील, प्रकाश लालझरे, पोटभरे, कैलास पवार, मंचक हारकळ, अमोल पाटील, युनूस हाशमी, रामभाऊ गालफाडे, सय्यद सलिम, मौलाना शेख हारुन, आदींसह इतरांची उपस्थिती होती. यावेळी आंदोलनास्थळी सर्व जाती धर्माच्या लोकांची उपस्थिती पहायला मिळाली.

आयोजित मोर्चाचे तहसीलवर धरने आंदोलनात रुपांतर झाले मौलाना खमरुदीन नदवी, मौलाना शेख हारुन, शेख खुर्शीद, दशरथ शिंदे पाटील, माजी मुख्यध्यापक नाथभजन, यांनी मनोगत व्यक्त केले. पाथरीचे प्रभारी तहसीलदार के.वी.वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धरने आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके, एएसआय कालापाड, इतर पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव