संभाजी विडीचे नाव बदलण्यासाठी आंदोलन ! शिवकार्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षासह 19 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संभाजी विडीचे नाव बदलण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शिवकार्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षासह 19 जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केले. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास लक्ष्मीनारायण चौकात हे आंदोलन करण्यात आले होते.

याप्रकरणी शिवकार्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ऋषिकेश भणगे, प्रथम गवळी, मयूर शिंदे, नीलेश पवार, अक्षय दाणी, संकेत भडाळे, जालिंदर इखे, ऋषीकेश झांबरे, ओंकार मांगडे, अक्षय गायकवाड, अभिषेक कृपाले, अमोल मोरे, विशाल कांबळे, रवी इंगळे, जय निकम, अजय येळे, शंकर मोरे, पीयूष साळुंके, सुमीत पढेर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई एम. आर. काटे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शहरात आंदोलन, मोर्चा, घोषणाबाजी करण्यास मनाई आहे. असे असतानाही शिवकार्य प्रतिष्ठाणच्यावतीने संभाजी विडीचे नाव बदलण्यासाठी विनापरवानगी आंदोलन केले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक लोहोटे यांनी दिली.