सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर बनवला जाणार सिनेमा, ‘हा’ अभिनेता साकारणार सुशांतची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन बराच काळ लोटला आहे. सुशांत सिंह राजपूतने खरोखर आत्महत्या केली होती की त्याची हत्या केली गेली हे आजही उघड झालेले नाही.

एकीकडे देशातील तीन मोठ्या तपास यंत्रणा सीबीआय, एनसीबी आणि ईडी हे रहस्य उघडकीस आणण्यासाठी बराच काळ प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे सुशांतच्या कथेवर आधारित चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित या चित्रपटाची निर्मिती सरला सारगोई आणि राहुल शर्मा करत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिलीप गुलाटी घेणार असून अभिनेता झुबैर खान यात सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. श्रेया यापूर्वी एका वेब सीरिजमध्ये काम करताना दिसली होती.

दिशा सालियनच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी बिग बॉस फेम अभिनेत्री सोमी खानची निवड झाली आहे. सुशांतच्या मृत्यूचा संबंध दिशा सलीयनच्या मृत्यूशी जोडला जाऊ शकतो असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटात शक्ती कपूर सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या उर्वरित पात्रांबद्दल, अरुण बक्षी सुशांतच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत तर अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटात प्रख्यात अभिनेते असरानी आणि सुधा चंद्रन देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटातील कलाकार आणि क्रू निश्चित झाले आहेत, आता हा सिनेमा निर्माण होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like