बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात साकारणार ‘७४’ वर्षाच्या महिलेची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हीने दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. ती तिच्या अभिनयाने खूपच प्रसिद्ध झाली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘स्ट्रीट डांसर 3 डी’ सध्या खूपच चर्चेत आहे. श्रद्धा कपूरची भूमिका प्रत्येक चित्रपटात वेगळी असते.

आता तिची एक गोष्ट चाहत्यांच्या समोर आली आहे. ती म्हणजे श्रद्धा कपूर सिल्वर स्क्रिनवर ७४ वर्षाच्या महिलेची भूमिका करणार असल्याचे समजले आहे. तेलगू प्रोड्यूसर सुरेष बाबू हे एक कोरियन ड्रामा चित्रपट ‘मिस ग्रैनी’ चा हिंदी रिमेक बनवणार आहे. ज्यासाठी श्रद्धा कपूरची निवड केली आहे. या चित्रपटात श्रद्धा ७४ वर्षाच्या महिलेची भूमिका साकारु शकते.

कोरियन ड्रामा चित्रपट ‘मिस ग्रैनी’ हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये एक ७४ वर्षाची महिला एक फोटो स्टुडिओमध्ये आपला फोटो काढण्यासाठी जाते पण रहस्यमय मार्गाने २० वर्षाची बनते. यानंतर ती म्यूजिकमध्ये आपले करिअर करते. आपल्या नातुसोबत एक ब्रॅंड बनवते. त्याला माहित नसते की, आपण आपल्या आजीसोबत ब्रॅंडमध्ये काम करत आहोत. सध्यातरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली गेली नाही. लवकरच या चित्रपटाची घोषणा होईल.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे तेलगू वर्जन नंदीनी रेड्डी बनवत आहे. ज्याचे नाव ‘ओह बेबी’ असणार आहे. श्रद्धा फक्त या चित्रपटात काम करत नसून नितीश तिवारीचा चित्रपट ‘छिछोरे’ चित्रपटात एका वुद्ध महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी श्रद्धाने ‘हसीना पारकर’ मध्ये एका वयोवुद्ध महिलेची भूमिका साकारली होती. आता श्रद्धा प्रभाससोबत ‘साहो’ आणि वरुण धवनसोबत ‘स्ट्रीट डांसर 3डी’ चित्रपटात काम करत आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

नपुंसकता आणि कमजोरी नष्ट करते ‘खारीक’

‘हे’ उपाय केल्याने नियंत्रणात राहील रक्तदाब

गंभीर आजारांचे संकेत देते शरीर, दुर्लक्ष करू नका

डोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, दुर्लक्ष करू नका