पुण्यात सोनसाखळी चोरणारे कल्याणमधील सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कल्याण येथून पुण्यात येऊन सोन साखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. हे दोघे महिन्यातून एकदा पुण्यात येत असत. पुण्यातील औंध भागात मागील सात महिन्यांपासून या दोघांनी उच्छाद मांडला होता. महिन्यात एकदाच चोरी करून जात असल्याने पोलिसांना डोकेदुखीचा विषय ठरत होता.परंतु खडकी पोलिसांनी सापळा लावून चोरी करताना दोघांना रंगेहाथ ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी परेश किशोर धावरी (28) आणि आकाश राजेश कंडारे (22) दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 193 ग्राम सोन्याचे 5 लाख 95 हजार 500 रुपये किमतीचे दागिने आणि ऐवज जप्त केला असल्याची माहिती परिमंडल 4 चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

या आरोपींकडून ९ चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून, यांना पकडण्यासाठी सिसिटीव्ही चा मोठा उपयोग झाला. गस्त घालतेवेळी पोलिसांच्या लक्षात आले होते की , हे दोघे चोरी करताना नंबर नसलेल्या गाडीचा उपयोग करत होते. पोलिसांनी त्यावेळी पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु ,चकमा देऊन दोघे पळून गेले होते. ७ जून रोजी सकाळी एक महिला रस्त्याने जात असताना हे दोघे मागून आले आणि गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पळून गेले. महिलेने ताबडतोब फोन वरून पोलिसांना माहिती दिली , यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत अर्ध्या तासात घटनास्थळाच्या जवळून दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींचे आई वडील मुंबई मनपात कर्मचारी

दोघे जिगरी मित्र असून दोघांचे आईवडील मुंबई मनपात सफाई कामगार आहेत . एका आरोपीचा मामा खडकीत राहतो ,त्याची बाईक घेऊन तिची नंबर प्लेट बदलून हे चोरी करायचे. सात महिन्यांपासून चोरी करत होते परंतु याची कल्पना मामाला नव्हती.

ही कारवाई परिमंडळ 4 चे पोलीस उपआयुक्त दीपक साकोरे, खडकी विभाग सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक (क्राइम) अजित लकडे, डीबी टीम चे पोलीस सब इंस्पेक्टर निलेश महाडिक, एएसआई लक्ष्मण बंगार, पोलीस कर्मचारी हेमंत माने, तुषार शिंदे, किरण घुटे, अण्णा ठोकळ, रणधीर माने, सुरेश गेंगजे, बाबा शिर्के, अशोक शेलार, विशाल मेमाणे, गणेश लोखंडे, प्रदीप गाडे, विनायक मुधोलकर, सुभाष आढाव, किशोर दुशिंग यांनी केली.