MP Amol Kolhe | छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’?, खा. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एक व्हिडीओ शेअर करत छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्य रक्षक’ होते की ‘धर्मवीर’ यावर अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी भाष्य केले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, औरंगजेबाने आदिलशाही, कुतुबशाही नेस्तानाबूत केली. स्वत:च्या बापाला आणि सख्ख्या भावांची कत्तल केली. त्यामुळे धर्मयुद्ध असण्यापेक्षा ही सत्ता वर्चस्वाची लढाई होती. काबूल ते बंगाल सत्ता असलेल्या औरंगजेबाला 8 वर्ष दख्खनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी फरफटवलं होतं. त्यामुळे हे धर्मयुद्ध होत नाही. पण, संभाजी महाराजांना धर्मवीर ही बिरुदावली लावली, तर शेवटचे दिवस म्हणजे कैद केल्यापासून बलिदानाच्या काळापर्यंत त्यांना मर्यादित ठेवते, असे कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी म्हटले आहे.

स्वराज्यरक्षक बिरुदावली जास्त व्यापक

त्यापेक्षा स्वराज्यरक्षक ही बिरुदावली खूप जास्त व्यापक ठरते.
कारण संभाजी महाराजांनी 9 व्या वर्षापासून स्वराज्यासाठी त्याग केला.
शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) निधनानंतर पाच आघाड्यांवर मात करत संभाजी महाराजांनी
स्वराज्य राखलं. त्यामुळे केवळ धर्म म्हणण्यापेक्षा तत्कालीन इतिहासाचा विचार केला तर देव, देश आणि धर्म
या तिनही गोष्टींचा परिपाक होता, तो म्हणजे स्वराज्य, असं मत अमोल कोल्हें यांनी मांडले आहे.

Web Title :-  MP Amol Kolhe | ncp mp amol kolhe react ajit pawar statement chhatrapati sambhaji maharaj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahavitaran Strike | संपाच्या 72 तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास ; पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा राहणार

Maharashtra Politics | मोदींनी नारायण राणेंना चांगलेच खडसावले; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा