MP Amol Kolhe | ‘पवार साहेबांचा आशिर्वाद डोक्यावर आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर’ – खासदार डॉ. अमोल कोल्हे (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविषयी आमच्याही मनात आदर आहे. शंभर टक्के आदर आहे. मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावर आहेत ते आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे, असं म्हणत खा. कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. कोल्हे यांनी आज (शनिवारी) पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) खेड घाट आणि नारायणगाव बायपासचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.

Baramati News | बारामती तालुक्यात उद्यापासून कोरोना निर्बंधात वाढ, शनिवार-रविवार पूर्णपणे बंद

काय म्हणाले अमोल कोल्हे?

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी शुक्रवारी सायंकाळी या बायपासचे शिवसैनिकांना घेऊन अचानक उद्घाटन केल्याने राज्यात असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीत वाद उफाळताना दिसत आहे. यावरून आज उद्घाटन कार्यक्रमावेळी खा. अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेत्यांना धारेवर धरले आहे. माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) व माजी खासदार शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao) यांच्यावर कोटी केली. निवडणुकीनंतर पद गेल्यानंतरची ही अस्वस्थता राज्यात अनेकांना आहे. दुर्दैवाने शिरुरमध्ये सुद्धा आढळराव बैचेन आहेत. त्यातूनच त्यांनी हे काल (शुक्रवारी) उद्घाटन केलंय. इतक्या वयस्कर व्यक्तीने असं वागणं बर नाही. असा घणाघात देखील डॉ. कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी लगावला आहे.

Ajit Pawar | सचिन वाझेच्या पत्रात पवारांचा उल्लेख, अजित पवारांची चौकशी करावी; हायकोर्टात याचिका दाखल

पुढे बोलताना खा, अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांविषय आमच्याही मनात आदर आहे. शंभर टक्के आदर आहे. मुख्यमंत्र्याविषयी आदर नसता तर आता जे आरोप करतात त्यांनी माझी संसदेतील भाषणे बाहेर काढून पाहावीत. त्रास होईल मला संसदेत बोलताना बघून, पण एकदा भाषण काढून बघा ना. महाराष्ट्र सरकारची, माननीय मुख्यमंत्र्यांची बाजू संसदेत अभिमानाने कोण मांडत हे तुम्हाला समजून जाईल आणि मग सांगा आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे किंवा नाही.

MP Amol Kolhe | uddhav thackeray as cm sharad pawars blessings are on his head say amol kolhe (Video)

पण या मुख्यमंत्र्यांनी त्यांची काम लोकांपर्यंत पोहचवावी, महाविकास आघाडीचं काम लोकांपर्यंत पोहचावं
म्हणून या अभियानाची सुरुवात करायला दिली पण या अभियानाची काम सोडून फक्त आमच्यावर टीका करणं
हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल आणि हा एक कलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावामागे लपवला जात
असेल तर प्रामाणिकपणे सांगतो माननीय मुख्यमंत्र्याबद्दल आदर आहे मात्र ते मुख्यमंत्रिपदावर आहेत ते
कारण आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे कोल्हे यांनी म्हटलं आहे की, ‘राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. इथे काही लोक म्हणतात, की सगळे चोर एकत्र झाले. दुर्दैवाने या चोराकडे BMW नाही. या चोराला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 शुटिंग करावं लागते तेंव्हा त्याच्या घरची चूल पेटते. तेव्हा ज्याच्याकडे BMW आहे ते चोर की ज्यांच्याकडे BMW नाही ते चोर. हे यांचं यांनी ठरवावं’ असा आरोप देखील आढळराव व सोनावणे यांच्यावर केला आहे.

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 432 रुग्णांना डिस्चार्ज

का म्हणाले होते शिवाजी आढळराव?

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी अमोल कोल्हे
यांच्यावर शुक्रवारी जोरदार टीका केली आहे. व शिवसैनिकांसमवेत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी
खुला केला होता. खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union
Minister Nitin Gadkari) यांच्याकडे वारंवार आपण पाठपुरावा करुन (शनिवारी) 17 जुलैला या बाह्यवळणाचे काम पूर्ण होत असताना अचानक उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला.
असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  MP Amol Kolhe | uddhav thackeray as cm sharad pawars blessings are on his head say amol kolhe (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update